पुणे -पुण्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री ठाकरे स्वतः गाडी चालवत विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. ते पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सोबतच पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाबाबत घेतल्या जाणाऱ्या उपाय योजनांचाही आढावा घेणार आहेत. पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुख्यमंत्री पुण्याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्याला मुख्यमंत्री काय उत्तर देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही उपस्थितीत असणार आहेत. त्यासोबत पुण्याचे विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला साडेबारा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात सुरुवात होणार आहे. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत प्रशासकीय यंत्रणेसमवेतही एक बैठक होणार आहे.
- अपडेट
बैठकीला सुरुवात...