महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वायसीएम रुग्णालयात होणार रॅपिड टेस्ट; अवघ्या २५ मिनिटात समजणार कोरोना रिपोर्ट - YCM Hospital in pimpari chinchwad

दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे उद्यापासून (3 जुलै) एक लाख ॲन्टिजेन किट उपलब्ध होणार आहेत.

Corona Rapid Test will be held at YCM Hospital in pimpari chinchwad
वायसीएम रुग्णालयात होणार रॅपिड टेस्ट

By

Published : Jul 2, 2020, 8:10 PM IST

पुणे - दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे उद्यापासून (3 जुलै) एक लाख ॲन्टिजेन किट उपलब्ध होणार आहेत.

कोरोनाची लक्षणे असणारे तसेच कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची सध्या स्वॅबद्वारे चाचणी होते. परंतु, आता या किटचा वापर करुन अशा व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन किटच्या सहाय्याने प्रथम चाचणी करण्यात येणार आहे. अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटात या संशयितांना कोरोनाची लागण झालेली आहे की नाही याची माहिती मिळणार असून, कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न होणार आहे.

या ॲन्टिजेन किटमुळे स्वॅबद्वारे होणारी चाचणी त्यासाठी लागणारा वेळ, येणारा खर्च वाचणार असून कोरोना प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. प्रामुख्याने या किटचा वापर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या को-मॉरबिड व्यक्ती, गरोदर महिला, फ्रंटलाईन कर्मचारी व कन्टेनमेंट झोनमधील व्यक्ती यांच्यासाठी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास स्वॅब टेस्टींग लॅबकरीता आयसीएमआरची मान्यता मिळालेली असून उद्यापासून याठिकाणी स्वॅब टेस्टींग सुरु होणार आहे. यामुळे संशयित कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित न राहता जलद गतीने प्राप्त होण्यास मदत होणार आहे. अशी माहिती महापौर माई उर्फ उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details