बारामती -कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला परिसर आता बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. बारामती शहरांमध्ये दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने शहरातील समर्थ नगर परिसर सील केला आहे. तसेच त्यावर नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला परिसर आता बफर झोन म्हणून घोषित - pune baramati
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला परिसर आता बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
baraamati corona
त्यानुसार तात्पुरते बारामती शहरातील स्थलांतरित केलेले भाजी मार्केट, फळविक्रेते, चिकन, अंडी मटन, आणि मच्छी यांचेही दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र इतर जीवनावश्यक वस्तू या आ आदेशातून वगळण्यात आले आहेत. मात्र संबंधित आदेशाची उल्लंघन केल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.