महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'भाजप-सेनेने एकत्र यावे, अन्यथा परिणाम वाईट होतील' - सुनील घनवट

भाजप-सेनेचे एकमेकांशी भांडण हे हिंदूत्व विसरल्याचे लक्षण आहे. भाजपने जुने दिवस विसरू नये. राजकारणात कृतज्ञता ठेवावी. १५-२० आमदार असलेला भाजप पक्ष हा मोठा झाला यात शिवसेनेचे योगदान आहे हे विसरता कामा नये, असा टोला हिंदू संघटनांनी भाजपला लगावला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषद

By

Published : Nov 20, 2019, 7:05 PM IST

पुणे - राज्यात लवकरात लवकर भाजप-शिवसेना युतीचे सरकार यावे तसेच, शिवसेनेने हिंदू विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत जाऊ नये, अशी मागणी समस्त हिंदू आघाडी, राजे शिवराय प्रतिष्ठान, पतित-पावन हिंदू जनजागृती समिती यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषदेत केली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी झाल्यास त्याचे परिणाम सर्वच राजकीय पक्षांना भोगावे लागतील, असा इशाराही या संघटनांनी दिला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषद

आपली भूमिका स्पष्ट करताना, हिंदुस्थानाला सामर्थ्य पुरवठा करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. हा देश चैतन्यशिल राहिला पाहिजे ही जबाबदारी महाराष्ट्रच्या राज्यकर्त्यांवर आहे. पण ही जबाबदारी विसरुन येथील राजकारणी मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. भाजप-शिवसेनेला जनादेश असताना सरकार स्थापन झाले नाही. जनतेच्या मनातील खदखद राज्यकर्त्यांपर्यत पोहोचवण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे.

भाजप-सेनेचे एकमेकांशी भांडण हे हिंदूत्व विसरल्याचे लक्षण आहे, असा आरोपही या संघटनांनी केला आहे. भाजपने जुने दिवस विसरू नये. राजकारणात कृतज्ञता ठेवावी. १५-२० आमदार असलेला भाजप पक्ष हा मोठा झाला यात शिवसेनेचे योगदान आहे, हे विसरता कामा नये, असा टोला या संघटनांनी भाजपला लगावला आहे. लोकांना भाजप-शिवसेनेचे सरकार हवे असून त्यासाठी दोघांनीही एक पाऊल मागे येऊन एकत्र होण्याचा सल्ला या संघटनांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details