पुणे- राज्यातील आणखी एका दिग्गज नेत्याच्या पुढच्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात उतरल्या असून पहिल्याच निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने विजयी
काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या राजकारणाच्या मैदानात उतरल्या असून त्यांच्या पहिल्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्या बहुमताने विजयी झाल्या आहेत.
विजयी अंकिता पाटील व अन्य
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने विजय झाला आहे. अंकिता पाटील या १७ हजार २७४ मतांनी विजयी झाल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या मृत्यूनंतर जिल्हा परिषद सदस्य पद रिक्त झाले होते. यासाठी जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेसाठी २३ जूनला मतदान झाले होते.