चाकण (पुणे) -पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या विचारात घेता मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी व भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा.लिमिटेड (चाकण, ता. खेड) या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरू करणे आवश्यक आहे. एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा.लिमिटेड चाकण कंपनीला विद्युत जोडणी करण्यासाठी परिसरातील इतर कंपन्यांचा विद्युत पुरवठा ठराविक कालावधीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
एअर लिक्वीड या कंपनीस मेडीकल ऑक्सीजन उत्पादन सुरू करण्यासाठी एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड चाकण या कंपनीस विद्युत जोडणी करण्यासाठी 132 के.व्ही. चिंचवड- चाकण विद्युत वाहिनी, 220 के.व्ही. व्होकसवॅगन ते 220 के.व्ही. चाकण उपकेंद्र ही वाहिनी व 220 के.व्ही. चाकण उपकेंद्रामधून निघणारे सर्व 22 के.व्ही. व 132 के. व्ही. वाहिनीचा पुरवठा दिनांक 15 ऑगस्ट 2020 ला सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.
चाकण परिसरातील कंपन्यांचा विद्युत पुरवठा ठराविक कालावधीसाठी बंद - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद - pune corona update news
या दिवशी ज्या रुग्णालयांना ते मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा करतात, त्यांच्याशी मागणी बाबत समन्वय ठेवून आवश्यक तो मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थीतीत रुग्णांची गैरसोय होणार नाही याबाबतची जबाबदारी संबंधित कंपन्यांची राहील.
मे.आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि. व मे टायोनिपॉन सॅनसो इंडिया प्रा. लि. चाकण या दोन कंपन्यांच्या मेडिकल ऑक्सीजन उत्पादनावर देखील या विद्युत पुरवठा बंद कालावधीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे.आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि.चाकण व मे टायोनिपॉन सॅनसो इंडिया प्रा. लि. चाकण यांनी सध्या होत असलेला मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा दिनांक 15 ऑगस्ट 2020 ला व त्यानंतर देखील विनाअडथळा सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दिवशी ज्या रुग्णालयांना ते मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा करतात, त्यांच्याशी मागणी बाबत समन्वय ठेवून आवश्यक तो मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थीतीत रुग्णांची गैरसोय होणार नाही याबाबतची जबाबदारी संबंधित कंपन्यांची राहिल.
एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड, चाकण ही कंपनी इतर राज्यात मेडिकल ऑक्सीजनचे उत्पादन करत असल्याने त्यांनी बंद कालावधीमध्ये मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी आयनॉक्स एअर प्रोडक्टस चाकण व टायोनिपॉन चाकण यांच्याशी समन्वय साधून मेडिकल ऑक्सीजन पुरवठा करण्याची जबाबदारी एअर लिक्वीड इंडिया होल्डिंग, चाकण यांची राहील. त्यापुढे पुणे शहरातील व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये व इतर रुग्णालये यांना मेेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत राहील, याची जबाबदारी आयनॉक्स एअर प्रोडक्टस प्रा. लि. चाकण (ता. खेड) व टायोनिपॉन (चाकण ता, खेड) यांची राहील.
एअर लिक्वीड इंडिया होल्डींग प्रा. लिमिटेड चाकण या कंपनीस विद्युत जोडणी करण्याकरीता दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग नियंत्रण नयम 1897 तसेच भारतीय दंड विधान 1860 चे कलम 188 प्रमाणे सर्व संबंधित दंडात्मक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.