पुणे - जिल्ह्यातल्या पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. सी व्हिजिल अॅपच्या माध्यमातून तक्रारी घेतल्या जात असून आत्तापर्यंत सुमारे ३०० तक्रारी आल्या आहेत. यापैकी ३३ तक्रारी वगळण्यात आल्या असून ४ तक्रारी प्रलंबित आहेत. तर २६१ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात आचारसंहिता उल्लंघनाच्या ३०० तक्रारी - register
पुणे आणि बारामती लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत गुरुवारपासून सुरू झाली आहे. मावळ आणि शिरूरसाठी २ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
पुणे आणि बारामती लोकसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत गुरुवारपासून सुरू झाली. ४ एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. मावळ आणि शिरूरसाठी २ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्या प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून जवळजवळ ५ हजार जणांवर कारवाई केली जाणार आहे. जर एखाद्या उमेदवारावर गुन्हे असतील गुन्हे असतील तर त्याने त्याची माहिती वर्तमानपत्र, वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ३ वेळा जाहिरात देणे बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणचे ३९ हजार २७ आणि खासगी ठिकाणचे ७ हजार बॅनर काढण्यात आले आहेत. १२ हजार परवाना धारकांपैकी ४ हजार ५३० शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. ३६ हजार लिटर दारु जप्त केली आहे. ५४० मिली ग्रॅम ड्रग ही जप्त केले असून एकूण कारवाईत १८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात २० लाखांची रोखड जप्त करण्यात आली असून आयकर विभाग याचा तपास करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघातील तयारी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.