महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रयान-२ संपूर्ण जगासाठी मैलाचा दगड ठरेल - अंतराळ शास्त्रज्ञ लीना बोकील

चंद्रयान-२ हे चंद्राच्या दक्षिण भागामध्ये पोहोचणार आहे. यापूर्वी चंद्राच्या दक्षिण भागामध्ये कुठल्याही देशाचे यान पोहोचलेले नाही. त्यामुळे जगातील सगळ्या अंतराळ संशोधन संस्थांचे लक्ष भारताच्या चंद्रयान-२ या मोहिमेकडे लागले आहे.

अंतराळ शास्त्रज्ञ लीना बोकील

By

Published : Jul 22, 2019, 12:28 PM IST

पुणे - चंद्रयान-२ दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारे पहिले यान असणार आहे. त्यामुळे चंद्रयान-२ केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची मोहीम ठरेल असे मत, अंतराळ शास्त्रज्ञ लीना बोकील यांनी व्यक्त केले आहे.

माहिती देताना लीना बोकील, अंतराळ शास्त्रज्ञ

यासंदर्भात लीना बोकील म्हणाल्या कि, पहिल्या चंद्रयान मोहिमेमध्ये आपण चंद्राच्या मध्यभागी पोहोचलो होतो. तर चंद्रयान-२ हे चंद्राच्या दक्षिण भागामध्ये पोहोचणार आहे. यापूर्वी चंद्राच्या दक्षिण भागामध्ये कुठल्याही देशाचे यान पोहोचलेले नाही. त्यामुळे जगातील सगळ्या अंतराळ संशोधन संस्थांचे लक्ष भारताच्या चंद्रयान-२ या मोहिमेकडे लागले आहे.

त्याचप्रमाणे, जगातील अन्य अंतराळ संशोधन संस्थांच्या तुलनेत भारताने खूप कमी किमतीमध्ये यशस्वीरित्या अंतराळ मोहिमा राबवल्या आहेत. त्यामुळे भारत अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून उदयास आला आहे, असेही लीना बोकील यावेळी म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details