पुणे- पुण्यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट सक्तीची कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. या प्रश्नाबाबत पुण्यातील आमदारांनी मंगळवारी मुख्यंमत्र्यांची भेट घेतली.
पुणेकरांना दिलासा.. हेल्मेट सक्तीची कारवाई तात्काळ थांबवा, मुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश - pune traffic problem
मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट सक्तीची कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
प्रतिकात्मक छायाचित्र
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लवकरच पुण्यात आमदारांची बैठक घेऊ, असेही मुख्यंमत्र्यांनी सांगितले. हेल्मेटच्या या कारवाईमुळे शहरातील वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे, त्यामुळे आमदारांनी मुख्यंमत्र्यांची भेट घेतली, असे माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
आमदार माधुरी मिसाळ, आमदार विजय काळे, आमदार जगदीश मुळीक, आमदार योगेश टिळेकर आणि आमदार भीमराव तापकीर यांनी मुख्यंमत्र्यांची भेट घेतली.
Last Updated : Jun 18, 2019, 5:28 PM IST