पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड येथे पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीत दोन्हीही ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. दोन्ही पक्षाकडून आम्हीच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. अश्यातच आज या दोन्ही पोट निवडणुकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की या दोन्ही जागांवर गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार तिथे काम आहेत. दोन्हीही ठिकाणी जनतेचा विश्वास असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे विजयी होणार आहेत. आज दोन्हीही ठिकाणी भाजप तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहेत. आज जनतेची कामे होत असून जनता दोन्ही उमेदवारांना विजयी करणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मोशी येथे दौऱ्यावर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोशी येथे दौऱ्यावर असताना त्यांनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर मी बोलण्याआधीच खासदार गिरीश बापट यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, काळजी करू नका. दोन्हीही ठिकाणी आपले उमेदवार हे विजयी होणार आहेत. ते जरी खासदार असले तरी त्यांनी एक कडवट कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यांनी मला सांगितले आहे की मी इथे आहे काळजी करू नका. आपणच विजयी होणार आहे. संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.