पुणे -दौंड शहरातून जाणारा मनमाड ते सांगली हा राष्ट्रीय महामार्ग रस्ता मोठा होण्यासाठी तोंडी व लेखी स्वरुपाची सूचना प्रशासनाला केली. परंतु, प्रशासन गांभीर्याने विषय हाताळत नसल्याचे दिसत आहे. म्हणूनच येथील अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा रस्ता मोठा झाला पाहिजे, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
दौंड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढवण्यासाठी नागरिकांचे आंदोलन हेही वाचा... भारत बचाओ रॅली : 'देशात भांडणे पेटवून मूळ मुद्यांना बगल देणं हाच भाजपचा डाव'
मनमाड-सांगली हा राष्ट्रीय क्रमांक 160 अहमदनगर-दौंड- बारामती- फलटण यामार्गाने पुढे सांगलीला जाणार आहे. त्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग प्रत्यक्षात 24 मीटरचा आहे. अहमदनगर जिल्हातील शेवटच्या काष्टी गावापर्यंत 24 मीटरचा असून प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून हा राष्ट्रीय महामार्ग 12 मीटरचा करण्यात येत आहे. दौंड शहरातील काही ठिकाणी अतिक्रमण न काढता रस्त्याचे कामे केली जात आहे. त्याचा विरोध करण्यासाठी दौंड शहरातील अनेक राजकीय पक्ष आणि नागरिकांच्यावतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा... शिक्षेच्या अंमलबजावणी प्रक्रियेला वेग; निर्भयाचे गुन्हेगार तणावाखाली, खाणे-पिणे झाले कमी - सूत्र
दौंड शहरातील उड्डाण पूल ते गोल राऊंड हा रहदारीचा मुख्य रस्ता नियमानुसार केला जात नाही. शहरातून जाणारा मनमाड ते सांगली हा राष्ट्रीय महामार्ग रस्ता नियमानुसार २४ मीटरचा व्हायला हवा. परंतु, काही ठिकाणी तो १८ मीटर तर काही ठिकाणी १२ मीटरचा केला आहे. वास्तविक पाहता हा रस्ता मोठा होणे गरजेचे आहे. मात्र काही अतिक्रमणे वाचवण्यासाठी हा रस्ता लहान केला जातोय, असा आरोप नागरिकांनी केला.
हेही वाचा... मुख्यमंत्री सहायता निधीला गती मिळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
शुक्रवारी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात 'दौंडकर जागे, व्हा रस्ता रुंदीकरणासाठी एकत्र या' हा नारा देत आंदोलन केले. दौंडकराच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही, अतिक्रमण काढा दुर्घटना टाळा, मायबाप सरकार जागे व्हा अशा स्वरूपाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान, नगरसेवक राजेश गायकवाड आदी नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.