पुणे- पाणी समजून डिझेल पिल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील देहूगाव भागात घडली आहे. वेदांत गौतम गायकवाड, असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याच नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने शुक्रवारी रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पाणी समजून डिझेल पिल्याने चिमुकल्याचा मृत्यू; पुण्यातील घटना - Rahul wagh
पाणी समजून डिझेल पिल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील देहूगाव भागात घडली आहे.
पुण्यातील देहूगाव परिसरातील विठ्ठलवाडी येथे गौतम गायकवाड हे पत्नी, मुलगा आणि मुलगीसह राहत होते, सामान्य कुटूंब असल्याने घरात गॅस नव्हता, त्यामुळे ते स्टोव्हचा वापर करत जात होते. गायकवाड यांच्या पत्नीने स्टोव्ह पेटवण्यासाठी डिझेलचा वापर केला होता. ती बाटली आहे तशी जमिनीवर पडून राहिली. वेदांत खेळता खेळता घरी गेला आणि त्याने पाणी समजून डिझेल पिले. दरम्यान, हे सर्व वेदांतच्या आईच्या लक्ष्यात आले. वेदांत उलटी करू लागला, डोळे पांढरे पडत होते, त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. तर एकीकडे त्याच्या आईला काय करावे सुचत नव्हते. अखेर वेदांतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्यावर उपचार सुरू झाले. परंतु, रात्री उशिरा त्याची मृत्यूशी झुंज संपली. त्याचा या घटनेत मृत्यू झाला. आई वडील दोघे ही मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकतात. मात्र, या घटनेने त्यांना हादरा बसला आहे. दरम्यान या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.