पुणे - अतिदक्षता विभागातील रुग्णासारखी सध्या देशाची अवस्था झाली आहे. त्यावर वेळेत औषधोपचार करावे लागतील, अशी चिंता माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केली. सुटाबुटातले हे सरकार असून सामान्य लोकांच्या हातात ते पैसे येऊ देत नाहीत, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम हेही वाचा - केरळ सरकारने अर्थसंकल्पाच्या मुखपृष्ठावर छापले गांधींच्या हत्येचे छायाचित्र
देशातली आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी विशिष्ट वर्गाच्या हाती पैसे एकवटले जाऊ नये, असेही ते यावेळी म्हणाले. पुणे काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अर्थसंकल्पासह त्यांनी एनआरसी आणि सीएएवरही भाष्य केले. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजित कदम, बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा - रांजणगावमध्ये कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल
'देशाचा विकास दर घसरला असून परदेशी निधी आणि गुंतवणूक कमी झाली आहे. उद्योग बंद पडत आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आर्थिक मंदीमुळे उद्योग तोट्यात असून बेरोजगारी वाढली आहे' अशी टीका यावेळी चिदंबरम यांनी केली. सरकार या प्रश्नांवर उपाययोजना करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा - 'सैन्यदलाच्या सुविधा मिळाल्याने शस्त्रास्त्रे वेगाने विकसित होण्यात मदत होणार'
चुकीच्या पद्धतीने नोटबंदी आणि जीएसटी राबवले गेल्याने अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. लोकांच्या हातात पैसे नसल्याने क्रयशक्ती कमी होऊन उद्योग व्यवसाय डबघाईला आले आहेत. यामुळे सरकारची विश्वासहर्ता शून्यावर आली असल्याचे ते म्हणाले.