पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीने अवघ्या तीन वर्षाच्या मुलीच्या अंगावर अमानुष चटके दिल्याची घटना समोर आली आहे. यात ३ वर्षीय प्राची (बदललेले नाव) गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने अज्ञात व्यक्तीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अवघ्या ३ वर्षाच्या मुलीला दिले अंगावर चटके ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल - वैद्यकीय तपासणी
रविवारी पीडित मुलगी घरात एकटीच होती. तेव्हा, अज्ञात व्यक्तीने घरात शिरून तिला मेणबत्तीने हातावर, मांडीवर आणि पाठीवर चटके दिले.
रविवारी पीडित मुलगी घरात एकटीच होती. तेव्हा, अज्ञात व्यक्तीने घरात शिरून तिला मेणबत्तीच्या साहाय्याने हातावर, मांडीवर आणि पाठीवर चटके दिले. यात ती गंभीर जखमी झाली आहे. पीडितेची आई आल्यानंतर घटनेचा उलगडा झाला, असे पोलिसांनी सांगितले आहे. घटने प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये मेणबत्तीचे चटके दिल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेचा तपास सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल अस पोलिसांनी सांगितले आहे.