पुणे - शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा होणार आहे. यानिमीत्त बाल शिवाजीची मूर्ती साकारण्यात आली आहे. बालरुपाला शोभेल असे सोने, चांदी, तांबे अशा विविध धातूंच्या वापरातून बनविलेला शिवकालीन अंगरखा मूर्तीला घालण्यात आला आहे. शिवजयंतीच्या दिवशी ही मूर्ती खास आकर्षण ठरणार आहे.
शिवनेरीवर होणार शिवजन्म सोहळा; बाल शिवबाची मूर्ती खास आकर्षण - shivaji
बाल शिवबाची मूर्ती बनविण्यासाठी सोने, चांदी, तांबे यांनी बनविली आहे.
शिवनेरी नगरी कालपासुन शिवजन्मात्सवासाठी सज्ज झाली आहे. देशभरातून शिवप्रेमी गडाकडे निघाले आहेत. या सोहळ्याचे आकर्षण शिवाजी महाराजांची बालरुपातील मूर्ती असणार आहे. जन्मोत्सव सोहळ्यात ही मूर्ती पाळण्यात असणार आहे. नाशिक येथील वयोवृद्ध शिल्पकार सुधाकर लोंढे यांनी ती साकारली आहे. मूर्तीचा खर्च शिवजन्मभूमि संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजळे यांनी केला आहे.
बाल शिवबाची ही मूर्ती बनवून घेताना इतिहासाच्या अभ्यासकांकडून डिझाइन बनवून घेण्यात आले. त्यानुसार मूर्ती बनविण्यात आली आहे. यापूर्वी २००१ ला तुळजाभवानीचा पलंग बनविणाऱ्या ठाकूर बंधूंकडून शिसम लाकडाचा पाळणा बनवून तो अर्पण करण्यात आला होता. हा पाळणा शिवकालीन धाटणीचा असून त्यासाठी लागणारे उच्च प्रतीचे लाकूड नेसरी येथून आणण्यात आले होते.