महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Chandrasekhar Bawankule : संजय राऊत यांनी सकाळी उठल्यावर टोमणे मारणे बंद केले पाहिजे - चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार ही येत्या फेब्रुवारी मध्ये पडणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. (he should stop taunting ) यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की संजय राऊत यांनी दोन गोष्टी केल्या पाहिजे. ( Chandrasekhar Bawankule said to Sanjay Raut ) एक तर सकाळी उठल्यावर टोमणे मारणे बंद केले पाहिजे आणि दुसर म्हणजे जेल मधून त्यांनी जी भाषा शिकून आले आहेत. ती भाषा बंद केली पाहिजे. ( Sanjay Raut that he should stop taunting )

Chandrasekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Jan 11, 2023, 2:34 PM IST

चंद्रशेखर बावनकुळे

पुणे :पुण्यात जी२०च्या बैठकांचे औचित्य साधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेशची भाजप जी२० समिती गठित केली आहे. या समितीची बैठक पुण्यात पार पडली. यावेळी ते बोलत होते. ( he should stop taunting ) तसेच यावेळी बावनकुळे म्हणाले की संजय राऊत यांनी आत्ता सकाळी उठून टोमणे मारणे बंद केलं पाहिजे. ( Chandrasekhar Bawankule said to Sanjay Raut ) विरोधी पक्षाचे जे काम आहे. ते केले पाहिजे. या राज्यातील जनतेला काही पाहिजे आहे. ते त्यांनी बघावे. विकासाच्या मुद्द्यावर सरकारला सूचना कराव्या. जगातील सर्वात विधवांना पैकी एक विदवान संजय राऊत हे आहे. राज्यातील जनता आत्ता अशा या टोमण्याना वैतागली असून राऊत यांनी सरकारला विकासाच्या बाबतीत सूचना कराव्या असे देखील यावेळी बावनकुळे यांनी सांगितले. ( Sanjay Raut that he should stop taunting )

आयोग काय निर्णय घेते यावर सगळे आहे :राज्यातील ठाकरे आणि शिंदे गटात निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणीबाबत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की धनुष्यबाणबाबत निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. त्याची निर्णयाची वाट पाहयाल हवी. आयोग काय निर्णय घेते यावर सगळे आहे. मला तुम्हाला काय वाटत महत्वाचे नाही. आपण तर्कवितर्क काढून अर्थ नाही. भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळकी वाढली आहे का असे बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की राष्ट्रवादीशी जवळीक नाही. शरद पवार कुठे भेटले तर आमचे काम आहे की त्यांना भेटावे. महाराष्ट्रात त्यांनी काम केले आहे. त्याचा प्लॅटफॉर्म वेगळे आमचे वेगळे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यांनी आमच्या काही जमीन घेतले नाही. ही राजकिय लढाई आहे.अस यावेळी बावनकुळे म्हणाले.

समाजात चुकीचा संदेश जाऊ नये :राज्यात सध्या सुरू असलेल्या ऊर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील आरोप प्रत्यारोपवर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की चित्राताई यांनी जे मांडल ते महाराष्ट्र संस्कृती बद्दल मांडले आहे. हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र आहे. संविधानाने स्वतंत्र दिले आहे. समाजात चुकीचा संदेश जाऊ नये असे मत वाघ यांचे होत. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या बाजूने तो वाद आहे. त्यामुळे या वादात मी पडण योग्य नाही. अस देखील यावेळी बावनकुळे म्हणाले. अजित पवार यांनी केलेल्या विधानावर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की अजितदादाने चॅलेंज केले मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. त्यांना वाटेल ते त्यांनी करावे. त्यांनी त्यांचे मागचे इतिहास पाहून घ्यावा. बोलताना पदावर असताना आपण कसे वागत होतो. यांचे जुने व्हीडीओ काढावे अन पाहावे. त्यांनी सभागृहात म्हटले मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मग त्यांना वाटेल ते त्यांनी करावे, असे यावेळी बावनकुळे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details