पुणे - 'तुमचा आमचा जो पंगा आहे, तो पक्ष म्हणून चालू द्या, तुम्ही शिवाजी महाराजांच्या वंशजापर्यंत कुठे पोहोचलात? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना केला. उदयन राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत, असे संजय राऊत म्हणाले होते. या वक्तव्याचा पाटील यांनी निषेध केला. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजापर्यंत कुठे पोहोचलात? - संजय राऊत न्यूज
संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राऊतांनी टीका करण्याची खूप खालची पातळी गाठली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता शांत बसणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
संजय राऊत चुकून बोलले की, जाणीवपूर्वक बोलले, याबाबत मला प्रश्न पडला आहे. राऊतांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राऊतांनी टीका करण्याची खूप खालची पातळी गाठली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता शांत बसणार नाही, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा - "इंदिरा गांधींबद्दल तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही"
अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्या भेटीच वक्तव्य संजय राऊत यांनी केले. हे खूप गंभीर वक्तव्य असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.