पुणे- गेल्या 5 ते 6 दिवसाच्या विदर्भ प्रवासात मी काही बोलत होतो. त्यावर प्रतिक्रिया म्हणून संजय राऊत बोलत होते. आत्ता याच एकत्र बोलायचे झाले तर भारतीय जनता पक्ष राज्यात अतिशय आक्रमकपणे आपली संघटनात्मक ताकत वाढवत आहे. त्या संघटनात्मक ताकदीच्या आधारे यापुढे कुठलीही निवडणूक जे आमचे सहयोगी पक्ष आहे.त्यांच्याबरोबरच पुढील निवडणुका आम्ही लढणार आहोत. अन्य कुठल्याही मोठ्या पक्षाबरोबर आम्ही युती करणार नाही. कारण की आमच्या बरोबर राहून आमच्या मताच्या आधारे शिष वाढवून आणि त्या वाढलेल्या शिषच्या आधारे दुसऱ्याशी बार्गेनिंग करून विश्वासघात केल्याने ते आम्हाला चालणार नाही. यापुढे आम्ही आमच्या ताकतीवर विजय होऊ, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
हम किसी को टोकेंगे नही यदी हमे किसीने टोका तो हम उसे छोडेंगे नही
पाठीत खंजीर खुपसलं, असे मी बोलल्यानंतर ते झोंबल आणि त्यावर संजय राऊत म्हणाले, आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही तर कोथळा काढतो. यावर मी उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे आणि कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की यावर पोलीस ठाण्यात तक्रार द्या. जर राणे यांच्या 'त्या' वाक्यावर त्यांची अटक होते. संजय राऊत यांचा वाक्य तर खूप भयंकर असून उद्धव ठाकरे यांनी ऍक्शन घेतली पाहिजे, असेही यावेळी पाटील यांनी सांगितले. कोथळा काढण्यासाठी हातात काहीतरी लागतं आणि ते पेलण्यासाठी तुमच्या दंडात ताकत आहे का हे ही बघा आम्हीपण मेलेल्या आईच दूध पीलेलं नाही. त्यामुळे हम किसी को टोकेंगे नही यदी किसीने हमे टोका तो हम उसे छोडेंगे नही. तुम्ही जे म्हणाल ते आम्ही सांगायचे का एक स्क्रिप्ट तुमची सकाळी असते. त्यावर तुम्ही दिवसभर चालवता ती स्क्रिप्ट आत्ता तुम्ही मला देणार का, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली.
राजू शेट्टी का आक्रमक होऊ नये
राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. यावर ते आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. ते का आक्रमक होऊ नये. देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामे न करताच मदत केली. हे सरकार का करत नाही. पंचनाम्यासाठी शिल्लक काय राहील आहे का. काय पंचनामे करणार जस कोरोनाची मदत जाहीर केली. पण, दिली नाही तसच आत्ताही या सरकारच चालले आहे. राजू शेट्टी तर वाढवून मागत आहे. पण, जे आहे तेच हे सरकार देत नाही, अशी टिकाही यावेळी पाटील यांनी केली आहे.