पुणे- राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मागील वर्षी प्रमाणे यंदाही मुस्लीम समाजाला पवित्र रमजान महिना कडक निर्बधांमध्येच मुस्लीम समाजाला साजरे करावे लागले. येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी (चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी) सर्वत्र मुस्लीम बांधवांच्या वतीने रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह पुणे शहरात ही हाहाकार माजवला आहे. यामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व मुस्लीम बांधवांनी यंदाची ईद ही साध्या पद्धतीने आणि गोर-गरीब गरजू लोकांना मदत करून साजरी करावी, असे आवाहन मुस्लीम समाजाचे धर्मगुरू मौलाना शबी अहसन काझमी यांनी केले आहे.
आतापर्यंत शासनाच्या नियमांचे पालन केले पुढं ही करा
पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम धर्मियांच्या वतीने एक महिना उपवास (रोजा) केले जाते. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे ज्या पद्धतीने मागच्या वेळी टाळेबंदीमध्ये साध्या पद्धतीने घरी राहून ईद साजरी करण्यात आली होती. यंदाही त्याच पद्धतीने सरकारच्या नियमानुसार घरीच राहून ईद साजरी करावी. तसेच आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये याच देखील भान ठेवत ईदच्या खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहनही मौलानांनी केले आहे.
लोकांनीही सरकारला सहकार्य करावे