पुणे - सध्याची भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता या दुष्काळी परिस्थितीचा फटका आता शहरी नागरिकांना सहन करावा लागत आहे. खेड तालुक्यातून वाहणारी भीमानदी कोरडी पडली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरी नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शहरी नागरिकांनाही दुष्काळाचा फटका; पाणीसाठ्याचे बंधारे पडले कोरडे - question
गेल्या दोन दिवसांपासून राजगुरुनगर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील नागरिकांची पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.
ग्रामीण व शहरी भागांमध्ये वाढती लोकसंख्या पाहता पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजगुरुनगर शहरात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील नागरिकांची पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. यामध्ये खासगी टँकरने विकतचे पाणी घेऊन नागरिक आपली उपजीविका भागवत आहेत. मात्र, सध्या दुष्काळी परिस्थितीचा फायदा घेऊन खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर मोठ्या प्रमाणात पैसे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिक वारंवार करत आहेत. मात्र, याकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही.
'पाणी हेच जीवन' मानले जाते. मात्र, याच पाण्यावर सध्या धंदा मांडला जातो आणि राजकीय मंडळी सध्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दंग असून नागरिकांच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही दिवसांपूर्वी राजगुरुनगर नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी नागरिकांना पाणी वापराबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, नागरिकही पाणीबचतीचेसाठी कुठल्याही उपाययोजना करत नाहीत. त्यामुळे वाढता पाण्याचा वापर पाहता सध्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. काही दिवसांमध्ये चासकमान धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडले जाईल, त्यानंतर पाण्याचा सुरळीत पुरवठा होणार असल्याचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी सांगितले.