पुणे : भाजप-सेना युती सरकारमध्ये राज्याचे माजी सामाजिक न्याय, क्रीडा मंत्री असलेले उत्तम प्रकाश खंदारे (वय 65) यांच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अनैसर्गिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधीच असे गुन्हे करीत असतील तर, सामाजिक परिस्थिती अणखी ढासाळण्यची शक्याता पुण्यातील नागरिकांचे म्हणणे आहे. एका पिडितेने खंडारे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. लग्नाचे अमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिडीत महिलेला उत्तम खंदारे यांच्या पासून एक मुलगा झाला आहे. त्याच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद म्हणून चेक दिले मात्र, चेक बॅंकेत वटवले नाहीत. याबाबत विचारणा केल्यानंतर पिडीत महिलेतेला इतर आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल: 37 वर्षे पीडित महिलेवरवर आमदार उत्तम प्रकाश खंदारे यांनी पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या आयबी रेस्ट हाऊस या शासकीय निवासस्थात बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी बिबेवाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. उत्तम प्रकाश खंदारे हे मूळचे सोलापूरचे असून १९९५ मध्ये युतीच्या सरकारात राज्यमंत्री होते. 37 वर्षी पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून त्यांनी वांरवार तिच्यावर अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप आहे. पिडितेच्या म्हणण्यानुसार खंडारे यांनी अनैसर्गिक बलात्कार करुन वेळोवेळी अत्याचार केला होता असा आरोप तीने केला आहे.