महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Car Tempo Accident : पुण्यात कार अन् टेम्पोची समोरासमोर धडक; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू - कार टेम्पोचा अपघात तिघांचा मृत्यू

Car Tempo Accident : पुण्यात कार आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. हे तिघेही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील रहिवासी आहेत.

accident file photo
अपघात फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 8:14 AM IST

पुणे/शिरूर : Car Tempo Accident पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भीषण (Pune Accident News) अपघात झालाय. तळेगाव ढमढेरे येथे टेम्पो आणि कारच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. तळेगाव ढमढेरे परिसरातील तोडकरवस्ती या ठिकाणी हा अपघात झाला आहे.

कारमधील तिघांचा जागीच मृत्यू - भीषण अपघातात कारमधील कविता बोरुडे (वय ४०), योगिता बोरुडे (वय ४०) व कारचालक राजू शिंदे (वय २५, तिघेही रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील किशोरी बोरुडे (वय १७) ही मुलगी तसेच टेम्पोमधील धीरज कांतीलाल लोखंडे व श्रीराम बापूराव मांडे असे तिघे जखमी झाले आहेत.

दोन्ही वाहनांचा चक्काचूर - याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर असणाऱ्या तोडकर वस्ती येथे वेगात असलेले टेम्पो व कार यांची.समोरासमोर धडक.झाली. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झालेले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता.की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

जखमींवर उपचार सुरू - या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. अपघातात अनेकांना आपले प्राण देखील गमाववे लागले आहेत. अपघात नेमका कुठल्या कारणामुळे घडला हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून घटनस्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जखमींना जवळच्या.रुग्णालयात.दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. या प्रकरणाच्या अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी महामार्ग' मृत्यूचा सापळा बनलाय? अपघातांची मालिका थांबेना; जाणून घ्या आकडेवारी

ABOUT THE AUTHOR

...view details