महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव वेगात आलेली कार शिरली दुकानात, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद; अल्पवयीन चालकावर गुन्हा दाखल - pune car accident news

पुनावळे येथे भरधाव वेगात असलेल्या कारचा अपघात झाला होता. ही कार पलटी होऊन थेट रस्त्यालगत असलेल्या दुकानात शिरली होती. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पुनावळे अपघात
पिंपरी-चिंचवड पुनावळे अपघात

By

Published : Dec 23, 2020, 12:51 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील पुनावळे येथे भरधाव वेगात असलेल्या कारचा अपघात झाला होता. ही कार पलटी होऊन थेट रस्त्यालगत असलेल्या दुकानात शिरली होती. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दुकानाचे आणि अपघातग्रस्त कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. मांगीलाल जाट यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी-चिंचवड पुनावळे अपघा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ते चार अल्पवयीन मुले भरधाव वेगात कार घेऊन कोयतेवस्तीच्या दिशेने जात होते. त्यावेळीच हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. पुनावळे येथे भरधाव कार उलटून रस्त्याच्या लगत असलेल्या दुकानात शिरली. यात दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानुसार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने अपघातात जीविहितहानी झालेली नाही.
पिंपरी-चिंचवड पुनावळे अपघात

ABOUT THE AUTHOR

...view details