महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Call Girl Cheated : 74 वर्षीय आजोबांना 'कॉल गर्ल' ची भेट पडली 30 लाख रुपयांना - कॉलगर्लची भेट

Senior Citizen Cheating : सध्या पुणे शहरात वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक होत आहे. (Call Girl Dating) तसेच मागील काही दिवसांत पुण्यात देखील विविध गुन्ह्यांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. (Senior Citizen Dating Call Girl) अश्यातच पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रतिष्ठा जाईल या भीतीने एका 74 वर्षीय पुणेकर आजोबांना 'कॉल गर्ल' ची भेट 30 लाख रुपयांना पडली आहे. (Financial fraud)

Senior Citizen Cheating
फसवणूक

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 6:24 PM IST

पुणे : Senior Citizen Cheating : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी 74 वर्षीय व्यक्तीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्योती बनसोडे आणि रामचंद्र बापू कोरडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, २ जणांना यात अटक केली आहे.

आरोपींकडून पैशाची मागणी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जुलैमध्ये ज्योतीमार्फत एका 'कॉल गर्ल'ची भेट घेतली होती. त्यानंतर तक्रारदाराला ज्योतीचा फोन आला. पोलिसांनी 'त्या' कॉल गर्लला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलीय. तिच्या मोबाईलमध्ये तुमचं कॉल रेकॉर्डिंग आहे, अशी ज्योतीने बतावणी केली. पोलीस या गुन्ह्यात तुमचेही नाव टाकतील, अशी भीती दाखवून हा विषय संपवण्यासाठी पैशांची मागणी केली.

दरमहा एक लाख रुपयांची मागणी : आपली प्रतिष्ठा जाईल या भीतीने ज्येष्ठ नागरिकाने आरोपींना रोख आणि धनादेशाद्वारे वेळोवेळी ३० लाख ३० हजार रुपये दिले. परंतु, आरोपींनी दरमहा एक लाख रुपये न दिल्यास पोलीस कारवाई करतील अशी धमकी दिली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

कॉल गर्ल असल्याचे सांगून महिलेची बदनामी : बेगमपुरा भागातील एका महिलेचा फोटो व मोबाईल क्रमांक व्हायरल करुन महिला कॉल गर्ल असल्याची बदनामी करणारा मेसेज पसरवला. ही घटना 1 मे, 2021 रोजी औरंगाबादमध्ये घडली. यामध्ये मंगेश वाखारे नावाच्या व्यक्तीने दुसऱ्या एकाला व्हॉटसअपवर संबंधित महिलेचा मोबाईल क्रमांक पाठविला.

हेही वाचा:

  1. Police Custody To Rehan Sheikh: ड्रग्स पुरवठा करणाऱ्या रेहान शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी
  2. Thane Extortion Case : बिल्डर खंडणी प्रकरण; अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी टोळीतील शार्प शूटरच्या मुंबई विमानतळावर आवळल्या मुसक्या
  3. Doctor Looted Case : रुग्ण तपासणीसाठी डॉक्टरला घरी बोलावलं अन् मारहाण करत लुटलं; पाच आरोपी अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details