पुणे -राज्यातील एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रोश आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांपासून वेतन प्रलंबित आहे. या वेतनासाठी 9 नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करणार आहेत. सरकारने एसटी महामंडळाला तातडीने दोन हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी करण्यात एसटी कामगार संघटनेने केली आहे.
थकीत वेतन द्या; एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश आंदोलनाचा इशारा - पुणे लेटेस्ट न्यूज
दोन हजारांहून अधिक कर्मचारी कोरोनाबधित झाले असून आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगली जावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
थकीत वेतन द्या; एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश आंदोलनाचा इशारा
दोन महिन्यांचे पगार आणि थकीत वेतन दिवाळीच्या तोंडावर तातडीने द्यावे. दोन हजारांहून अधिक कर्मचारी कोरोनाबधित झाले असून आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगली जावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.