पुणे - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात बंदी झुगारून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग आणि गिरवली गावात या शर्यतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बैलगाडा घाटात भंडाऱ्याची उधळण करत बैलगाडा मालक, तरुणाई आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या आयोजनाकडे पोलीस प्रशासनाने मात्र साफ दुर्लक्ष केले असल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा -बाबा केदारनाथ आणि हिमालयातील उंच शिखरे केदारनाथला मला खेचून आणतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष -
बैलगाडी शर्यतीवर बंदी असून यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरू आहे. परंतु अशा परिस्थितीत देखील चोरून-लपून मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीचे आयोजन आंबेगाव तालुका परिसरात होताना पाहायला मिळत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.