पुणे :गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक मुलगी केंदुरच्या घाटामध्ये बैलगाड्याच्या पुढे घोड्यावर बसून घोडा पळवतांना दिसत आहे. या मुलीचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्या हिम्मतीला सर्वत्र दाद दिली जात आहे.
शर्मिला शिळीमकरचा विक्रम : बैलगाडी शर्यतीमध्ये फक्त बैलांच्या पुढे पुरुषच घोडे पळवत असतात. कारण या स्पर्धेमध्ये धोके खूप असतात. हे धोके पत्करण्याचे साहस आत्ता पर्यंत पुरुष करत होते. ज्यांना घोडस्वारी येते किंवा जे अनेक वर्षांपासून घोडे पळवत तेच नागरिक या स्पर्धेत भाग घेत आसतात. परंतु आत्ता या क्षेत्रात नव्याने साहस करणारी पहिलीच मुलगी शर्मिला शिळीमकर असून तिने केंदूरच्या घाटात 10 सेकंदात बैलगाड्यांच्या पुढे घोडा पळवत विक्रम केला आहे. तिने हा विक्रम रामनवमीच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदुर घाटात आयोजित बैलगाडा शर्यतीत हा रेकॉर्ड केला आहे.
10 सेकंदात घोडा पळवण्याचा रेकाॅर्ड : पुण्यातील धनकवडी येथे राहणाऱ्या शर्मिला शिळीमकर ही पुण्यातील हुजूरपागा शाळेत इयत्ता 9 वी शिकत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर बैलगाडी बाबत व्हिडिओ पाहत असताना यात घोडस्वारीमध्ये तिला फक्त पुरुष दिसले. तेव्हा तिला वाटले की, आपण ही यात जावे. या बाबत तीने आपल्या वडिलांना दिली. तेव्हा वडिलांनी मुलगी काहीतरी वेगळं करू पाहत आहे यासाठी तिला योग्य मार्गदर्शन ट्रेनिंग देण्यात आली. तीन महिन्यांत जॅकी वैभव निकाळजे, शंतनु या दोघांच्या ट्रेनिंग नंतर तिने केंदुरच्या घाटामध्ये 10 सेकंदात घोडा पळवण्याचा केला आहे.
केंदूरच्या घाटात घोडा पळवण्याची संधी :विशेष म्हणजे शर्मिला शिळीमकर हिची फायनलची परिक्षा असून सुद्धा ती बैलगाडा शर्यतीत खेडोपाडी जाऊन कौतुकाचा वर्षाव करून घेत आहे. या रेकॉर्ड बाबत ती म्हणाली की, मी कधीही घोड्यावर बसले देखील नाही. पण जेव्हा बैलगाडा शर्यत बाबत वाचले, पाहिले की यात फक्त पुरुष आहे तेव्हाच ठरवल की आत्ता घोडा पळवायचा आहे. त्यानंतर जेव्हा केंदूरच्या घाटात घोडा पळवण्याची संधी मिळाली तेव्हा सुरवातीला भीती वाटत होती. मात्र, विचार केला की, आत्ता हीच वेळ आहे, मिळालेल्या संधीच सोनं करण्याची. तेव्हा घोड्याला टाच मारली आणि नवा विक्रम केल्याची प्रतिक्रिया तीने दिली आहे.
हेही वाचा - Adani Ports: अदानींची मोठी खेळी.. आणखी एक बंदर घेतले ताब्यात, अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण