पुणे :महाराष्ट्रात सध्या राजकीय परिस्थिती अस्थीर असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. याचाच फायदा घेण्याचे काम के. सी. चंद्रशेखर राव यांनी सुरू केले आहे, असे चित्र आता दिसत आहे. भारत राष्ट्र समितीने विस्तार वाढवण्यासाठी सुरुवातीला मराठवाड्यातल्या सीमांवरती जिल्ह्यांमध्ये अनेक आजी-माजी नेत्यांना प्रवेश देऊन मोठ्या सभा सुद्धा घेतल्या. त्यामुळे भारत राष्ट्र समिती हा एक महाराष्ट्राला पर्याय होऊ शकतो का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
पक्ष विस्तार करण्यासाठी प्रयत्न : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा देशपातळीवर विस्तार सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचे कार्य सुरू केले आहे. मध्यंतरी मराठवाड्यात पक्षासाठी जाहीर सभा घेतल्यानंतर आता त्यांनी विदर्भात पक्ष विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. उद्या नागपूर येथे भारत राष्ट्र समिती पक्ष, विदर्भ (BRS)च्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री, तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते केले जाणार आहे. यानिमित्त कार्यकर्ता मेळावा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. के. चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यानिमित्ताने नागपूर शहरात ठिकठिकाणी 'अब की बार किसान सरकार' असे बॅनर्स लावण्यात आले आहे.
वारकरी पालखी मार्गावर बॅनरबाजी :नुकत्याच पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांच्यासाठी खास विमानाची सोय सुद्धा करण्यात आली. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झाली. पंढरपूर येथे भगीरथ भालके यांचा राजकीय वावर असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी संपूर्ण वारकरी पालखी मार्गावरील बॅनरबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बॅन वरती फक्त चंद्रशेखर राव यांचेच फोटो लावलेले आहेत. तेलंगणा शासनाचे पैसे या बॅनरबाजीसाठी खर्च झाल्याची शक्यता आहे. एकंदरीत तेलंगणातल्या नागरिकांचे पैसे महाराष्ट्रातल्या बॅनरबाजीसाठी खर्च केल्याचे चित्र दिसत आहे.