पुणे - शहरातील मध्यवर्ती भागातील मंगळवार पेठ येथे वसंत बारमध्ये मंगळवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. हॉटेलमध्ये दारू आणि जेवणाचे बिल देण्यावरुन झालेल्या वादात हॉटेलमधील बाऊन्सरने पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या बाऊन्सरसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील बारमध्ये बाऊन्सरचा गोळीबार; दारुचे बिल देण्यावरून वाद - Bouncer firing at a bar pune
हॉटेलमध्ये मद्यपान आणि जेवण केल्यानंतर बिल देण्यावरून ग्राहकांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी भांडण केले. यावेळी वाद वाढल्याने हॉटेलमधील बाऊन्सरने पिस्तूलातून हवेत गोळीबार केला.
पुण्यातील बारमध्ये बाऊन्सरचा गोळीबार; दारुचे बील देण्यावरून वाद
हेही वाचा -सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला पुण्याजवळ अपघात; 16 जखमी
हॉटेलमध्ये मद्यपान आणि जेवण केल्यानंतर बिल देण्यावरून ग्राहकांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी भांडण केले. यावेळी वाद वाढल्याने हॉटेलमधील बाऊन्सरने पिस्तूलातून हवेत गोळीबार केला. महिमाशंकर तिवारी असे गोळीबार करणाऱ्या बाऊन्सरचे नाव आहे. तर तीन ग्राहक आणि हॉटेलमधील ९ कर्मचाऱ्यांच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.