पुणे - लोहगाव येथील भारतीय वायुदलाच्या शाळेच्या प्रांगणात मंगळवारी बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. त्यानंतर वायुदल आणि पुणे पोलिसांच्या पथकाने ही वस्तू परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवली आहे. ही बॉम्बसदृश वस्तू तेथे कोणी ठेवली याचा शोध पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.
लोहगाव येथील वायुदलाच्या शाळेत आढळली बॉम्बसदृश वस्तू - लोहगाव
भारतीय वायू दलाचे विंग कमांडर पी. एन. सिंग यांनी या घटनेविषयी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने लोहगाव येथील भारतीय वायुदलाच्या शाळेच्या प्रांगणात जाऊन पाहणी केली. यावेळी तेथे बॉम्बसदृश वस्तू आढळून आली.
प्राथमिक माहितीनुसार, भारतीय वायू दलाचे विंग कमांडर पी. एन. सिंग यांनी या घटनेविषयी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी पुणे पोलिसांच्या श्वानाने शाळेत स्फोटक वस्तू असल्याचे संकेत दिले होते.
पोलिसांनी ही वस्तू निष्क्रिय करून परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवली आहे. मात्र, अशाप्रकारे हा बॉम्बसदृश वस्तू शाळेच्या प्रांगणात आढळून आल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.