महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

थायलंडमधील निळ्या भाताचे मुळशीत उत्पादन, औषधी गुणधर्मामुळे एका किलोला मिळतोय २५० रुपये भाव! - Production in Mulshi Taluka in pune

Special story of Blue rice : पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भागांत मोठ्या प्रमाणात इंद्रायणी तांदळाचं पीक घेतले जाते. या भागातील इंद्रायणी तांदळाला देखील मोठ्या प्रमाणात राज्यात मागणी आहे. मात्र मलेशिया, थायलंड सारख्या देशात घेण्यात येणारा निळया तांदळाचे पीक घेण्याचा प्रयोग मुळशीमधील एका शेतकऱ्याने केला आहे.

Blue rice
निळ्या भाताचे मुळशी तालुक्यात उत्पादन

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 2:18 PM IST

निळ्या भाताचे मुळशी तालुक्यात उत्पादन

पुणे :Special story of Blue riceमुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू फाले यांनी खरीप हंगामात निळ्या भाताची लागवड केली होती. हा तांदूळ निळसर गडद जांभळ्या रंगाचा आहे. हा भात मलेशिया, थायलंड येथेच उत्पादित होतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे याला सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केला आहे. त्यामुळे बाजारात त्याला अधिक मागणी आहे.




मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती :हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारानं ग्रासलेल्या रुग्णांसाठी निळा तांदूळ गुणकारी आहे. फाले यांनी मुळशी तालुक्यात हा पहिलाच प्रयोग केला आहे. यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे तसेच कृषी सहाय्यक शेखर विरणक यांचे मार्गदर्शन लाभले. या भाताची उंची सात फुटांपर्यंत होते. हा भात 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होतो. भाताचे उत्पादन एक एकरात 1600 किलोपर्यंत होते. या तांदळास प्रतिकिलो 250 रुपये बाजारभाव मिळतो.

निळ्या तांदळाची पंचक्रोशीत चर्चा-औषधी गुणधर्मामुळे भात खरेदी करण्यासाठी पुणे शहरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात पसंती देतात. निळा तांदूळ प्रामुख्याने मलेशिया आणि थायलंड या ठिकाणी देशांमध्ये उत्पादित होतो. त्याचा निळसर गडद जांभळ्या रंगाचा तांदूळ अनेकांना आकर्षून घेत असून, फाले यांच्या निळ्या तांदळाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे.फाले यांनी केलेला हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हा तांदूळ उत्पादित करण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन घेतले होते.




निळ्या तांदळाचे औषधी गुणधर्म :सेंद्रीय निळा तांदूळ आरोग्य वर्धक असून यात लोह, झिंक, कॅल्शिअम व भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्सचे नुकसान कमी करतात. यामुळे कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, अल्जाइमर यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. निळ्या भातामध्ये लोह, झिंक, कॅल्शिअम, फायबर आणि इतर अनेक पोषक तत्व असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते. या तांदळाला बाजारात अधिक मागणी आहे.

हेही वाचा :

  1. कराडमधील एसबीएस कॉलेजमध्ये तलाठी, वकील, शिक्षक गिरवताहेत मोडी भाषेचे धडे, पाहा व्हिडिओ
  2. मुंबईकरांनो सुट्टीनिमित्त घराबाहेर पडताय; कोणत्या मार्गांवर असेल मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
  3. 'अधिवेशनात मला बोलूच दिलं नाही, विरोधकांची मुस्कटदाबी होते', रवींद्र धंगेकरांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details