पुणे Devendra Fadnavis On Loksabha Election २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. 2024 मध्ये आमचंच सरकार येणार असल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडीक़डून करण्यात येत आहे. याबाबत एक सर्वे समोर आला असून, यात महाविकास आघाडीला जास्त जागा लोकसभेत मिळणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. लोकसभेत आम्ही 40 च्या पार जाणार म्हणजे जाणारच, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
कोरोनामुळं पॅनिक होण्याची गरज नाही : संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी 'अटल गौरव पुरस्कार' देण्यात आला. यावेळी फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळं पॅनिक होण्याची परिस्थिती सध्या नाही. मात्र, काळजी घेण्याची गरज सर्वांना आहे. त्यामुळं या संपूर्ण परिस्थितीकडं लक्ष ठेवून आहोत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक घेऊन आदेश दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत. आपण अपेक्षा करूया की याचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
नागरिकांनी काळजी घ्यावी : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना करण्यात आल्या आहेत का? याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत लोकंही शिकले आहेत. कारण शेवटी यात सर्वाधिक त्रास हा लोकांनी सहन केला आहे. आपला पूर्वनुभव लक्षात घेता काळजी घ्यावी हीच आमची विनंती असणार आहे.
भाजपाचं लोकसभा 'मिशन ४५' : भाजपानं २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी मिशन घोषित केलं असून, त्या दृष्टीकोनातून पावलंसुद्धा उचलायला सुरुवात केली आहे. केंद्रातील मंत्री, मोठमोठे नेते राज्यात येऊन मतदारसंघात आढावा घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. परंतु दुसरीकडे बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या ठाकरे गटातील १३ खासदारांचं भवितव्य अधांतरीच असून जागा वाटपात त्यांच्या वाट्याला जागा येतील की नाही? हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
हेही वाचा:
- शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट! वाचा दोन्ही गटातील वर्षातील महत्त्वाच्या १० घडामोडींचा धावता आढावा
- दादा मोठे नेते, मी फार लहान कार्यकर्ता, त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही - अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
- अजित पवारांची खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका; हे राजीनामा द्यायला निघाले होते, यांच्यासाठी वळसेंसह मी जिवाचं रान केलं