पुणे - भाजपचे नेते अनिल शिरोळे यांना लोकसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यावर बोलताना, उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज होण्याइतका मी कमजोर नसल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज नाही - अनिल शिरोळे - नाराज
पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मान्य असून पक्ष सांगेल त्याप्रमाणेच काम करत राहणार असल्याचे शिरोळे म्हणाले.
गिरीश बापट यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर शुभेच्छा देताना अनिल शिरोळे
भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या गिरीश बापट यांचे अनिल शिरोळेंनी अभिनंदन केले. पक्षाने जो निर्णय घेतला आहे तो मान्य असून पक्ष सांगेल त्याप्रमाणेच काम करत राहणार असल्याचे शिरोळे म्हणाले. गिरीश बापट यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर पुण्यातल्या भाजप कार्यालयात अनिल शिरोळे यांनी बापट यांची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन त्यांनी गिरीश बापट यांचे अभिनंदनही केले.