माद्यमांशी संवाद साधताना आमदार गोपीचंद पडळकर पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादची प्रकरणे हे समोर येत आहे. याबाबत पडळकर म्हणाले की, कोल्हापूरजवळ असलेल्या एका खेड्या गावात एक महिला आणि तिच्या दोन जुळ्या मुली राहत आहे. या कुटुंबातील एका अल्पवयीन तरुणीला 2021 साली सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूर येथील जामा मशीद येथील मौलवी यांच्या इमदादा नायकोडी या मुलाने त्या अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली.
ओळखीचा घेतला गैरफायदा : तसेच त्या राजकीय ओळखीचा गैरफायदा घेऊन त्या मुलीला पळवून नेले. तेव्हा त्या मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी योग्य ती कलम लावले नाही. त्यामुळे तीन महिन्यात तो मुलगा जेलमधून बाहेर पडला. परत त्या मुलीला त्रास देऊ लागला. जेव्हा या मुलाने त्या मुलीला पळवले, तेव्हा तो तिला 8 महिने बाहेर होता. तेव्हा त्या मुलाने त्याला उर्दू शिकायला आणि नमाज पठण करायला लावले. ही धक्कादायक बाबा असून पोलिसांनी याची दखल घ्यावी, असे देखील यावेळी पडळकर म्हणाले.
पीडितेला सोडण्याचे कारण :दुसऱ्या प्रकरणाबाबत पडळकर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर येथे देखील असाच एक प्रकार घडला आहे. पिडीत तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्या मुलाने लग्न केले. घरच्यांनी लग्न केलेले असताना देखील या तरुणाने हिंदू मुलीशी खोटे बोलून लग्न केले, आणि तिला वेगळे ठेवले. जेव्हा ही पिडीत मुलगी गर्भवती झाली तेव्हा त्याने तिच्याशी भांडण केले. पिडीतेला त्याने बाळ झाल्यावर सोडून दिले. आज या मुलीला 2 वर्षाचा मुलगा आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या मुलाने या पीडितेला सोडण्याचे कारण नमाज पडत नाही, उर्दू बोलत नाही म्हणून मी तुला सोडत असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा :
- Love Jihad : उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद प्रकरणी महाराष्ट्रातील तरुणाला अटक, शेजारी म्हणतात मुले चांगली होती
- Nitesh Rane on Love Jihad : पावसाळी अधिवेशनात 'लव्ह जिहाद'विरोधात कडक कायदा येणार - नितेश राणे
- MP Love Jihad: अनामिका दुबे झाली उज्मा फातिमा... आई-वडिलांनी जिवंतपणीच मुलीचे केले पिंडदान, छापल्या श्रद्धांजलीच्या पत्रिका