पुणे :कोरोनाच्या विषाणूने अनेक नेत्यांना गाठलं आहे.भाजपा शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत मुळीक यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून माहिती दिली.
जगदीश मुळीक यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. ते पुढील उपचारासाटी रुग्णालयात दाखल झाले असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. 'त्यानं' मला गाठलं याचं दुःख नाही. पण, तुम्हा सर्वांपासून काही काळ दूर जावं लागणार, याचं वाईट वाटत आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं शनिवारी स्पष्ट झालं. आता युद्ध कोरोनाच्या विरोधात. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावर मी लवकरच ठणठणीत होईनच. तोवर तात्पुरता राम राम घ्यावा, अशी जगदीश मुळीक यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.