महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात भाजप-काँग्रेसमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर जुंपली, काळेंचे मोहन जोशींना खुल्या चर्चेचे आव्हान

काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना आम्ही खुल्या मंचावर चर्चेसाठी निमंत्रण देत आहोत, असे भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक आमदार विजय काळे यांनी जाहीर केले आहे.

पुण्यात भाजप-काँग्रेसमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर जुंपली, काळेंचे मोहन जोशींना खुल्या चर्चेचे आव्हान

By

Published : Apr 13, 2019, 9:41 PM IST

पुणे- काँग्रेसकडून सातत्याने भाजपच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना आम्ही खुल्या मंचावर चर्चेसाठी निमंत्रण देत आहोत, असे भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक आमदार विजय काळे यांनी जाहीर केले आहे.

भाजपचे पुण्यातील उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विजय काळे बोलत होते.

पुण्यात भाजप-काँग्रेसमध्ये विकासाच्या मुद्द्यांवर जुंपली, काळेंचे मोहन जोशींना खुल्या चर्चेचे आव्हान

काळे म्हणाले, मागील अनेक दशके पुण्यातील कित्येक विकास प्रकल्प रखडले होते. त्या विकास प्रकल्पांना आमचे सरकार आल्यावर चालना मिळाली आहे. मात्र, काँग्रेसकडून चुकीचा प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसला खुल्या मंचावर चर्चेसाठी निमंत्रित करत आहोत, असे काळे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details