पुणे- पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. बुधवारी शिवसेनेच्या गटनेते राहुल कलाटे यांनी सर्वसाधारण सभेत बोलू न दिल्याने काचेचा ग्लास फोडला. हे सर्व सभागृहामध्ये झाल्याने सभागृहात काही काळ गदारोळ निर्माण झाला होता.
शिवसेनेच्या गटनेत्याने सर्वसाधारण सभेत बोलू न दिल्याने फोडला काचेचा ग्लास - उषा ढोरे
बुधवारी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत महापौर उषा ढोरे यांनी बोलू न दिल्याने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आक्रमक झाले. त्यांनी टेबलावर ठेवलेला काचेचा ग्लास फोडून आपला राग व्यक्त केला. यावर ढोरे यांनी शिवसेनेच्या गटनेत्याची वागणूक चूकीची असल्याचे सांगितले.

दरम्यान कलाटे यांनी महापौर ढोरे यांच्या दिशेने ग्लास भिरकवल्याचा आरोप महिला नगरसेविकांनी केला आहे. पण हे आरोप कलाटे यांनी फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी कलाटे यांनी माफी मागावी, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांच्यासह अन्य महिला नगरसेवकांनी केली आहे.