महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात भाजप आमदार विजय काळेंविरोधात भाजपचेच कार्यकर्ते आक्रमक; निषेध करत दिल्या घोषणा

आमदार काळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून पत्रक भिरकावली. राज्यमंत्री योगेश सागर आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या समोर तब्बल दहा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. यावेळी कार्यकर्त्यांनी फलकबाजी आणि पत्रके भिरकावून आमदारांचा निषेध केला.

पुणे

By

Published : Jul 24, 2019, 11:51 PM IST

पुणे- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजप आमदार विजय काळेंविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला. 30 ते 40 कार्यकर्त्यांनी विजय काळे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत राडा केला. या आमदाराचे करायचे काय, खाली डोके वर पाय, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणाऱ्या आमदाराचा निषेध असो, आशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

पुण्यात भाजप आमदार विजय काळेंविरोधात भाजपचेच कार्यकर्ते आक्रमक; निषेध करत दिल्या घोषणा

आमदार काळे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून पत्रक भिरकावली. राज्यमंत्री योगेश सागर आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या समोर तब्बल दहा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. यावेळी कार्यकर्त्यांनी फलकबाजी आणि पत्रके भिरकावून आमदारांचा निषेध केला. अचानक झालेल्या गोंधळाने सर्वजण अवाक झाले.

यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी विजय काळे मनमानी पद्धतीने काम करतात. कार्यकर्त्यांना दाबून त्यांच्यावर ते अन्याय करत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्यांना पदक देऊन मोठे करत आहे. मात्र, ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष रुजवला, त्यांना दाबण्याचे काम काळे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details