महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bike Rider Died In Accident : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल - बारामतीत अपघात

डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बारामती शहरातील एमआयडीसी भागात अग्निशमन कार्यालयाजवळ (Bike Rider Died In Accident) घडली. संतोष माणिक ताठे (वय ४६, हल्ली रा. दादापाटील नगर, तांदूळवाडी, बारामती, मूळ रा. डोंना, ता. परांडा, जि. ऊस्मानाबाद) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव (Bike collision with dumper in Baramati) आहे.

Bike Rider Died In Accident
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By

Published : Dec 3, 2022, 7:43 AM IST

बारामती : डंपरने दिलेल्या धडकेतदुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बारामती शहरातील एमआयडीसी भागात अग्निशमन कार्यालयाजवळ (Bike Rider Died In Accident) घडली. संतोष माणिक ताठे (वय ४६, हल्ली रा. दादापाटील नगर, तांदूळवाडी, बारामती, मूळ रा. डोंना, ता. परांडा, जि. ऊस्मानाबाद) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. याबाबत तालुका पोलिसांनी डंपर क्रमांक एमएच-४३, वाय-६१६० वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Bike collision with dumper in Baramati) आहे.


फिर्याद दाखल :याप्रकरणी महावीर उत्तम सावंत (रा. अभिषेक हाॅटेलमागे, बारामती, मूळ रा. वाफेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली. शुक्रवारी (दि. २) रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना (Bike rider died in accident in Baramati) घडली.

दुचाकीला धडक : ताठे हे त्यांच्याकडील दुचाकी (एमएच-४२, पी.- २४१०) वरून कल्याणी काॅर्नर ते कटफळ चौक बाजूने येत चौकातून रस्ता क्राॅस करत असताना अग्निशमन कार्यालयाजवळ टाटा ट्रकवरील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अविचाराने, हयगयीने चालवत ताठे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्यांचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. अपघातानंतरही ट्रकचालकाने दुचाकीसह ताठे यांना खाली अडकवत पुढे बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत (Bike rider died in accident collision with dumper) नेले.

ABOUT THE AUTHOR

...view details