पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 192 वा पालखी सोहळा येणाऱ्या 11 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी आळंदीत पाहायला मिळत आहे. यावर्षी माऊलींचा रथ ओढण्यासाठी भोसले कुटुंबातील सर्जा- राजा या बैलजोडीला विशेष मान मिळाला आहे. या अगोदर देखील दोन वेळेस भोसले कुटुंब या विशेष मानाचा मानकरी ठरलेले आहे. सर्जा-राजा हे खिलार जातीची बैलजोड असून कर्नाटक येथून त्यांना साडेतीन लाख रुपयात भोसले कुटुंबाने विकत घेतले आहे. यावर्षी भोसले कुटुंबाला मिळालेल्या मानामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी आहेत.
पालखी पंढरपूरकडे प्रस्थान: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 192 वा पालखी सोहळा येणाऱ्या 11 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या आषाढी वारीसाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी या सोहळ्यासाठी येतात, ते धार्मिक वातावरणात रमून जातात. ज्ञानोबा माऊली तुकाराम गजरात अवघी आळंदी दुमदुमून जाते. या सोहळ्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे.