महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकराची पहिल्या सोमवारची 'महापूजा' संपन्न - अर्धनारीनटेश्वर

आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने देशभरातून अनेक भाविक भीमाशंकराच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पहाटे तीन वाजता मंदिर परिसराची साफसफाई करून शिवलिंगाचे पूजन करण्यात आले.

भीमाशंकर

By

Published : Aug 5, 2019, 7:40 AM IST

Updated : Aug 5, 2019, 8:08 AM IST

पुणे- हर हर महादेव ,ओम नमः शिवाय म्हणत आज(सोमवारी) पहाटे पासूनच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरला भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. आज श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने देशभरातून अनेक भाविक भीमाशंकराच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी भीमाशंकर परिसरामध्ये मोठी गर्दी केली आहे. पहाटे तीन वाजता मंदिर परिसराची साफसफाई करून शिवलिंगाचे पूजन करण्यात आले.

पहिल्या सोमवारची 'महापूजा'
भीमाशंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार प्राचीन काळात करण्यात आला असून या मंदिरातील शिवलिंग हे अनादी काळापासून असल्याची श्रद्धा भाविकांची आहे. अर्धनारीनटेश्वर रूप असलेले हे शिवलिंग एका बाजूला मातापार्वती तर दुसऱ्या बाजुला शिवशंकर असे आहे.
Last Updated : Aug 5, 2019, 8:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details