पुणे - कोरेगाव भीमा येथे आज (बुधवारी) 1 जानेवारीला विजयस्तंभावर शौर्यदिन साजरा होत आहे. या विजयस्तंभाला फुलमाळांची सजावट करण्यात आली आहे. तर रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी आणि विद्युत रोषणाई करून मानवंदना देण्यात आली. यावेळी असंख्य अनुयायांनी विजस्तंभला अभिवादन केले.
कोरेगाव भीमा शौर्य दिन : विजयस्तंभाला विद्युत रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीने अभिवादन - bhima koregaon shourya divas pune latest news
कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभावर रात्री बारा वाजता मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी विजयस्तंभाला विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आले.
कोरेगाव भीमा शौर्य दिन
कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभावर रात्री बारा वाजता मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. यावेळी विजयस्तंभाला विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आले. यानंतर नवीन वर्षाची सुरुवात करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. मोठ्या भक्तिभावाने विजय स्तंभावर येणाऱ्या प्रत्येक अनुयायाने मोठ्या उत्साहात अभिवादन केले.
हेही वाचा -शेतकरी अन् मच्छिमारांना नुकसानीचे ठरले सरते वर्ष..
Last Updated : Jan 1, 2020, 7:26 AM IST