पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील होते. मात्र, दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत होते. ठिकठिकाणच्या दुकानात गर्दी करत वस्तु खरेदी करित होते. बारामतीत ‘भिलवाडा पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच कशा पुरविल्या जातील. यातून किराणा 'होम डिलिव्हरी अॅप निर्माण करण्यात आले आहे.
बारामतीकरांना अॅपद्वारे घरपोच मिळणार किराणा; पोलीस प्रशासनाकडून होम डिलिव्हरी अॅपची निर्मिती - baramati police
दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत होते. ठिकठिकाणच्या दुकानात गर्दी करत वस्तु खरेदी करित होते. बारामतीत ‘भिलवाडा पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच कशा पुरविल्या जातील. यातून किराणा 'होम डिलिव्हरी अॅप निर्माण करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी स्वप्निल अहिवळे, विशाल जावळे, सुरेंद्र वाघ, संदिप जाधव, शर्मा पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली किराणा होम डिलिव्हरी अॅप विकसित केले असून आज (रविवार रोजी) बारामतीतील नागरिकांसाठी खुले करून दिले आहे.
शहराचे विविध विभाग करण्यात आले असून किराणा मालासह अन्य आवश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱया दुकानदारांची यादी अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. नागरिक ज्या भागात वास्तव्यास आहे. त्या भागाची निवड करून आवश्यक असणाऱया वस्तू सदरच्या अॅपमध्ये टाकल्यास नागरिकांना दुकानदार वा स्वयंसेवकांव्दारे घरपोच माल दिला जाणार आहे.