महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगळसूत्र चोरटे बारामती पोलिसांच्या ताब्यात

बारामती शहरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

अटक आरोपी व मुद्देमालासह पोलीस पथक
अटक आरोपी व मुद्देमालासह पोलीस पथक

By

Published : Dec 21, 2020, 9:27 PM IST

Updated : Dec 21, 2020, 9:59 PM IST

बारामती (पुणे)- बारामती शहरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहेत. चोरट्यांकडून तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण हस्तगत केले आहेत.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदीवेळी अक्षय विलास खोमणे (वय 24 वर्षे, रा. कोऱ्हाळे बु., ता.बारामती) यास अटक केली होती. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचे दोन सहकारी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय 32 वर्षे, सध्या रा. निरा, ता.पुरंदर, जि. पुणे) व राहुल पांडुरंग तांबे (वय 28 वर्षे, रा.जेऊर, ता.पुरंदर, जि.पुणे) या तिघांनी मिळून शहरात तीन ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपी सराईत गुन्हेगार

आरोपींनी बारामती शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी महिलांचा पाठलाग करून पत्ता विचारण्याचा बहाण्याने गळ्यातील सोन्याचे गंठण जबरीने हिसकावून चोरी करून चोरून नेले होते. पोलीस कोठडीतील आरोपी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे याच्याकडे तीन वेगवेगळ्या गुन्ह्यातील सहा तोळ्यांचे सोन्याचे गंठण हस्तगत केले. या आरोपींवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -पुणे रेल्वे स्थानक परिसरातून तब्बल 1 कोटी 3 लाख रुपयांची चरस जप्त, दोघे अटकेत

हेही वाच -लोणावळ्यात पर्यटकाला बेदम मारहाण; अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

Last Updated : Dec 21, 2020, 9:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details