पुणे - बारामती शहरात चारचाकी वाहनातून होणारी गांजाची तस्करी बारामतीच्या गुन्हे अन्वेषण विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईत ४१ किलो गांजा आणि कार असा एकूण ८ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तसेच पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बारामतीत गांजाची होणारी तस्करी उघडकीस; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई - station
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुती इर्टीगा (क्र. टीएस २९, बी ९६९८) मध्ये गांजा घेऊन बारामतीमध्ये विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बारामती एमआयडीसीमध्ये सापळा रचला.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुती इर्टीगा (क्र. टीएस २९, बी ९६९८) मध्ये गांजा घेऊन बारामतीमध्ये विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बारामती एमआयडीसीमध्ये सापळा रचला. या कारवाईमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या कारची पोलिसांनी तपासणी केली. यामध्ये ८२ हजार रुपये किंमतीचा ४१ किलो गांजा सापडला.
या कारवाईमध्ये तेलंगणा राज्याची पासिंग असलेली सुमारे ८ लाख रुपये किंमतीची कारदेखील जप्त करण्यात आली आहे. गांजा तस्करी प्रकरणी नवीनकुमार पांडू जाटू, किसन सैदा नाईक लावरी, राकेश धर्मा लावरी (सर्व रा. हैद्राबाद), उमेश लक्ष्मण गायकवाड (रा. बीड), अनिल राजू गायकवाड (रा तांदुळवाडी वेस बारामती) या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.