बारामती -वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर बारामतीत काल मध्य रात्रीपासून सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज बारामतीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना कडकडीत बंद असून सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.
बारामती आजपासून सात दिवस कडकडीत बंद
बारामतीमध्ये वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर बारामतीत काल मध्य रात्रीपासून सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज बारामतीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना कडकडीत बंद असून सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. सदर टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये १ उपविभागीय पोलिस अधिकारी, १२ अधिकारी व १२० कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी व ४० होमगार्ड असा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
शहरातील रस्त्यांवर अत्यावश्यक सेवा वगळता एकही वाहन व नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत नाही. स्थानिक प्रशासनाने लागू केलेल्या टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर ठीक ठिकाणी बॅरिगेट लावण्यात आले आहे.
बारामतीतील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात होत्या. मात्र तरीही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने प्रशासनाने टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. सदर टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये १ उपविभागीय पोलिस अधिकारी, १२ अधिकारी व १२० कर्मचारी, राज्य राखीव दलाची तुकडी व ४० होमगार्ड असा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली.