महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bangladeshi Arrested : बुधवार पेठेतील 'त्या' गल्लीतून 7 बांग्लादेशी नागरिकांना अटक.... - Bangladesh People

Bangladeshi Arrested : पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानं शहरात विनापरवाना राहणाऱ्या 7 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. बुधवार पेठेतील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचं वास्तव्य असलेल्या गल्लीत काही महिला व पुरुष बेकायदेशीर पद्धतीनं राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

7 Bangladeshis Arrested
7 बांगलादेशी नागरिकांना अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 1:43 PM IST

Updated : Sep 12, 2023, 1:50 PM IST

पुणे: Bangladeshi Arrested:गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शहरातील बुधवार पेठ परिसरात (Budhwar Peth pune) मोठी कारवाई केली आहे. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सात बांग्लादेशी देशी नागरिकांना (Bangladesh People) पकडण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. तर एका अल्पवयीन मुलीला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. तिला वेश्याव्यवसायासाठी बांग्लादेशातून पुण्यात आणण्यात आलं होतं.

आतापर्यंत 26 बांग्लादेशी नागरिक ताब्यात: पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या बुधवारपेठेत मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय केला जातो. या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला हे वेगवेगळ्या राज्यातून आलेले असतात. गेल्या काही महिन्यांपासून बांग्लादेशी नागरिकांचं बेकायदेशीररित्या वास्तव वाढलं आहे. पुणे पोलिसांकडून यावर लक्ष देत वेळोवेळी कारवाईदेखील केली जातेय. या महिन्याभरात केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 26 बांग्लादेशी नागरिकांना पकडण्यात आलं आहे.

बुधवारपेठ परिसरातून १९ बांग्लादेशींना अटक :याआधीहीपुण्यातील बुधवारपेठ परिसरातून १९ बांग्लादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलं होतं. हे सर्वजण अवैध पद्धतीनं पुण्यात वास्तव्य करताना आढळून आलं. यात १० बांग्लादेशी महिलांसह ९ पुरुषांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकानं बुधवारपेठ परिसरात शोध मोहीम हाती घेत या महिला आणि पुरुषांना अटक केली होती. हे बांग्लादेशी नागरिक बुधवार पेठेत मागील अनेक दिवसांपासून बस्तान बांधून राहिले होते. त्यामुळे या बांग्लादेशी नागरिकांवर पोलिसांनी (Illegal Bangladeshi migrants in India) ही कारवाई केल्याची माहिती पुणे पोलीस दलातील सामाजिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Nashik Sex Racket News : नाशिकमध्ये छुप्या सेक्स रॅकेटचा धुमाकूळ, आठ महिन्यात 50 पीडित महिलांची सुटका, 15 जणांना अटक
  2. 19 Bangladesh People Arrested : बुधवार पेठेत अवैध राहणाऱ्या १९ बांगलादेशींच्या आवळल्या मुसक्या
  3. Baramati Crime News : सुपारी देऊन पोटच्या मुलाचा केला खून; वयोवृद्ध मजूर दाम्पत्यासह पाच जणांना अटक
Last Updated : Sep 12, 2023, 1:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details