महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माळशेज घाटात पर्यटकांना बंदी, तर नाणेघाट परिसरात उपद्रव शुल्क आकारणी - ban

निसर्गाचे जमिनीवरील स्वर्ग जिथं पाहिलं जातं अशा माळशेज घाटात दरडी पडण्याचे प्रकार तसेच यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांच्या अनुषंगाने पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्या-मुंबईचे पर्यटक नाणेघाटात गर्दी करू लागले आहेत.

माळशेज घाटात पर्यटकांना बंदी

By

Published : Jul 14, 2019, 12:18 PM IST

पुणे- जुन्नर तालुक्यातील नाणेघाट व जीवधन परिसर निसर्गाने मुक्त उधळणीने नटला आहे. येथे पुणे आणि मुंबई परिसरातून अनेक पर्यटक विकेंडला या ठिकाणी येत असतात. अशात आता या पर्यटनस्थळी आजपासून उपद्रव शुल्क आकारणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आजच्या विकेंडला नाणेघाटात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. तर माळशेज घाटातही पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे.

निसर्गाचे जमिनीवरील स्वर्ग जिथं पाहिलं जातं अशा परिसरात टवाळखोरीचं वाढलेलं प्रमाण आणि माळशेज घाटात दरडी पडण्याचे प्रकार तसेच यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे, आता पुण्या- मुंबईचे पर्यटक नाणेघाटात गर्दी करू लागले आहेत.

माळशेज घाटात पर्यटकांना बंदी

नाणेघाट व जीवधन परिसराचे संवर्धन, संरक्षण व जतन करणे तसेच गावात रोजगार निर्माण करण्याच्या हेतूने वनविभाग व वनव्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला आहे. यासाठी पर्यटकांकडून उपद्रव शुल्क व वाहनतळ शुल्क घेण्यात येणार असून संयुक्त वन व्यवस्थापन समिती घाटघर यांच्या माध्यमातून सुरक्षा चौकी ही उभारण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details