महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांसोबत मंत्र्यांची गाडी अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर पार्क; क्रीडा मंत्र्यांची दिलगीरी - बालेवाडी क्रीडा संकुल

एकीकडे खेळाप्रती जागरूकता दाखवत खेळाडूंसाठी विद्यापीठ करण्याचे स्तुत्य पाऊल राज्य सरकार उचलत आहे. तर दुसरीकडे याच खेळांप्रती अनास्था दाखवत असल्याचे दिसत आहे.

वाहने पार्क
वाहने पार्क

By

Published : Jun 28, 2021, 1:53 PM IST

Updated : Jun 28, 2021, 2:16 PM IST

पुणे- बालेवाडी क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तयार केले जात आहे. राज्य सरकारने या विद्यापीठाला मंजुरी देत निधी ही दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी बालेवाडी येथे पाहणी केली. या दौऱ्यावेळी ताफ्यातील वाहने ही चक्क सिथेंटिक अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर आणण्यात आली होती. एवढेच नाही तर ट्रॅकवरच पार्क करण्यात आली होती. यावरून विरोधी पक्षाने जोरदार टीका केली आहे. क्रीडा मंत्र्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

शरद पवारांसोबत मंत्र्यांची गाडी अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर पार्क
पाहणी वेळी घडला प्रकारराज्यात खेळाला अधिक महत्व मिळावे तसेच खेळाडूंची प्रगती व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ करण्यात येते आहे. एकीकडे खेळाप्रती जागरूकता दाखवत खेळाडूंसाठी विद्यापीठ करण्याचे स्तुत्य पाऊल राज्य सरकार उचलत आहे. तर दुसरीकडे याच खेळांप्रती अनास्था दाखवत असल्याचे दिसत आहे. बालेवाडी क्रीडा संकुलाची क्रीडा पाहणी करण्यासाठी आलेल्या मान्यवरांची वाहने चक्क अथेलेटिक्स ट्रॅकवर चालवण्यात आल्याचा आणि त्या ठिकाणी पार्क केल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी खेळाप्रती असंवेदनशिलता दाखवणारी बाब पुण्यातल्या बालेवाडी येथे घडली आहे.अथेलेटिक्स ट्रॅकवर वाहनेराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद शरद पवार शनिवारी क्रीडा विद्यपीठाची पाहणी करण्यासाठी बालेवाडीला आले होते. यावेळी क्रीडा मंत्री सुनिल केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह क्रीडा आयुक्त आणि अधिकारी यांची बैठक देखील झाली होती. यावेळी राज्यात क्रीडा क्षेत्राला वाव मिळण्यासाठी हे विद्यापीठ महत्वाचे ठरेल तसेच या निमित्ताने नव्या जुन्या खेळाडूंना अनेक संधी मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. एकीकडे खेळांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्य सरकार तयारी करत असल्याचे दाखवले जात असताना दुसरीकडे या बैठकीसाठी बालेवाडी क्रीडा संकुलातल्या ज्या फुटबॉल स्टेडियममध्ये व्यवस्था करण्यात आली होती त्या स्टेडियमच्या आता असलेल्या सिंथेटिक अथेलेटिक्स ट्रॅकवर चक्क वाहने लावण्यात आली होती. बालेवाडी येथील हे सिंथेटिक अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून या ट्रॅकची निगा राखण्याबाबत कटकोर नियम आहेत.क्रीडा मंत्र्यांची दिलगिरीया कार्यक्रमात अत्यंत निष्कळजीपणा दाखवण्यात आला याबाबत क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आता क्रीडा विद्यापीठ होते आहे असे सर्व प्रकार बंद केले जातील, असे थातूर मातूर उत्तर दिले. नंतर क्रीडा मंत्र्यांकडून पत्रक काढण्यात आले होते. त्यात अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकच्या बाजूला असलेल्या सिमेंट ट्रॅकवरून मान्यवरांची एकच गाडी जाण्याचे नियोजन होते. मात्र, ऐनवेळी काही गाड्या अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. भविष्यात असा प्रकार होणार नाही, असे पत्रकातून जाहीर करण्यात आले.
Last Updated : Jun 28, 2021, 2:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details