शिंदे-फडवणीस सरकारच्या सत्तांतराचा दुष्परिणाम निवडणुकातून दिसेल पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी काल रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे पुण्यात दाखल झाले होते. आज सत्तांतर करून शिंदे फडवणीस सरकार महाराष्ट्रात आले आहे. त्याच्या चर्चा घराघरात आणि पारावर होत आहेत. ज्या पद्धतीने हे झाले ते महाराष्ट्रातल्या जनतेला बिलकुल आवडलेले नाही. त्याचे परिणाम हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील. त्याचबरोबर ठाकरे आणि शिवसेना हे वेगळी करता येणार नाही. ते वेगळे होणार नाही. त्यामुळे जनतेच्या मनातील गोष्टी निवडणुकीच्या माध्यमातूनच समोर येणार आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात दिलेली आहे.
शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार टीका : कोल्हापूरमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि काँग्रेसवर रविवारी जोरदार टीका केलेली आहे. शरद पवार आणि काँग्रेसने 70 वर्षात कसा महाराष्ट्र आणि देश मागे नेला हे सांगितले. त्यावर बोलताना काँग्रेसने काय केले ? तुम्हाला 2014 ला पंतप्रधान होता आलं? ती लोकशाही काँग्रेसने टिकवली. आज लोकांच्या मनात लोकशाही टिकेल का? नाही ही भीती आहे. हे काँग्रेसने केलेले होते.
लोकांच्या मनात लोकशाही टिकेल का? ही भीती : स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसने काम केले. स्वातंत्र्यानंतर देश आणि महाराष्ट्रात लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसने काम केले. तुम्ही जे आश्वासन देऊन 2014 ला सत्तेत आला त्याबद्दल तुम्ही बोला. बेरोजगारीचे काय झाले? महागाईचे काय झाले? या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुका लढून निवडून आलात. आज जनतेला महागाईला, बेरोजगारीला, तोंड द्यावे लागते. त्या मुद्द्यावर भाजपा आणि अमित शाह यांनी बोललं पाहिजे. पण ते बोलत नाहीत आज देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. असे सुद्धा यावेळी बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीची ताकद :कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभा मतदारसंघांमध्ये एक चांगला उमेदवार आम्हाला मिळालेला आहे. ज्याचा स्वतःचा एक लोकसंपर्क आहे. त्याचबरोबर आमच्या सर्वांची महाविकास आघाडीची ताकद त्यांच्या पाठीशी उभी केल्याने विजय निश्चित आहे. त्यासाठी त्याचा प्रचार करण्यासाठी ताकद देण्यासाठी मी पुण्यात आल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. त्यामुळे आता कसबा कोण जिंकणार याकडे संपूर्ण राज्याचे लश्र लागले आहे.
हेही वाचा :Uddhav thackeray on Amit Shah : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर 'मोगॅम्बो खूश हुआ', उद्धव ठाकरेंची खोचक टीका, तर शाह म्हणाले...